मुंबई : फाल्गुन मासची सुरूवात होताच होळीच्या सणाची तयारी सुरू होते. १७ मार्चला होळी आणि १८ मार्चला धुळवड आहे. फाल्गुन मासच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील प्रतिपदेच्या तिथीला होळी साजरी केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होलिका दहन १७ मार्च २०२२ रोजी आणि १८ मार्चला रंगपंचमी खेळली जाते. होळीला आनंद आणि उत्साहाचा सण मानला जातो. या दिवशी लोकं एकमेकांना रंगांनी रंगवतात. 


होळीच्या दिवशी अनेक लोक सफेद रंगाचे कपडे घालतात. धुळवडच्या दिवशी का घातले जातात सफेद रंगाचे कपडे? ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, सफेद रंगाचे कपडे का घालावेत? त्याचबरोबर रंगीबेरंगी कपडे का घालू नयेत? हे देखील महत्वाचं आहे. 


का घातले जातात सफेद रंगाचे कपडे?


होळीच्या दिवशी सफेद रंगाचे कपडे घालावेत. त्याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. 


सफेद रंगाचे कपडे शांती आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जातात. 


तसेच सफेद रंगाचे कपडे शुभ देखील मानले जातात. 


ज्या लोकांना सतत राग येतो त्यांनी सफेद रंगाचे कपडे घालावेत. 


होळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे होलिका दहनच्या दिवशी सफेद रंगाचे कपडे घालून सगळे सज्ज होतात. 


होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 


गुरुवार, १७ मार्च २०२२ रोजी होलिका दहन
होलिका दहनाचा मुहूर्त रात्री 09.6 मिनिटांपासून 10.16 मिनिटांपर्यंत राहील.
पौर्णिमेची आरंभ तिथी - १७ मार्च रोजी दुपारी १ वाजून २९ मिनिटांपर्यंत 
पौर्णिमेची समाप्त तिथी - १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत